160 रुपयांची बचत करून मिळवा 23 लाख रुपये, टॅक्स बेनेफिट आणि इतरही अनेक फायदे मिळतील – कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपल्याला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असल्यास आपण भारतीय जीवन विमा महामंडळाच्या अनेक पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. LIC पॉलिसीअंतर्गत तुम्हाला केवळ विमा संरक्षणच मिळणार नाही तर तुमच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करण्यात मदत होईल. सध्या, LIC कडे अशा अनेक पॉलिसी आहेत, ज्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यापैकी काही पॉलिसी या दीर्घकालीन तर काही अल्प मुदतीसाठी आहेत. तुम्हालाही थोडी गुंतवणूक करायची असेल आणि LIC ची पॉलिसी शोधत असाल तर नवीन मनीबॅक पॉलिसी तुमच्यासाठी चांगला पर्याय बनू शकेल. चला तर मग LIC च्या या पॉलिसीबद्दल जाणून घेऊयात …

LIC ची नवीन मनी बॅक पॉलिसी एक प्रकारची नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी गॅरेंटेड रिटर्न आणि बोनस देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाला 5 वर्षात पैसे परत मिळतात, मॅच्युरिटीवर चांगला रिटर्न तसेच दरवर्षी टॅक्स इन्शुरन्सचा बेनिफिटही मिळतो.

23 लाख रुपये कसे मिळवायचे ?
टॅक्स सूटसह बरेच फायदे उपलब्ध आहेत. हि पॉलिसी पूर्णपणे टॅक्स फ्री पॉलिसी आहे. यासह, त्याच्या व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्युरिटीवर मिळालेल्या रकमेवर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. या योजनेत तुम्ही 25 वर्षांसाठी दररोज 160 रुपये गुंतविल्यास 25 वर्षानंतर 23 लाख रुपये मिळतील

तुम्हाला दर पाचव्या वर्षीपर्यंत 20 टक्के रक्कम परत मिळेल
LIC च्या मते, 13 वर्षे ते 50 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती ही योजना घेऊ शकते. या योजनेत, दर पाचव्या वर्षी म्हणजेच 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी, 20 व्या वर्षी तुम्हाला 15-20% पैसे परत मिळतील. परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा प्रीमियमच्या किमान 10 टक्के रक्कम जमा केली जाईल. याद्वारे गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर बोनसही दिला जाईल. एकूण दहा लाखांच्या या योजनेत अपघाती मृत्यूचा लाभही मिळणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group