हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : देशात मोठ्या संख्येने लोकं रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज हजारो गाड्या चालविल्या जातात. मात्र जर कधी रेल्वेकडून या गाड्या रद्द, डायव्हर्ट किंवा री-शेड्यूल केल्या गेल्या तर लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. जर आपण आज (13 डिसेंबर रोजी) ट्रेनने प्रवास करणार असाल तर घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा. कारण रेल्वेकडून आजही 271 गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. Train Cancelled
रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आज रेल्वेने 246 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. त्याच वेळी, 25 गाड्या या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज 10 गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. तसेच, 11 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. या रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या रद्द होण्यामागे किंवा त्यांच्या वेळापत्रकात बदल होण्यामागे अनेक कारणे आहेत. काही वेळा खराब हवामानामुळे गाड्यांचे कामकाज प्रभावित होते. तसेच अनेक वेळा रुळांच्या दुरुस्तीमुळेही गाड्या रद्द कराव्या लागतात. Train Cancelled
ट्रेनचे स्टेट्स ऑनलाइन तपासा
रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती ऑनलाइन पुरवली जाते. रेल्वेच्या रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांची माहिती भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध असते. तसेच रद्द झालेल्या गाड्यांची माहिती NTES या App वरूनही घेता येईल. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटवर किंवा IRCTC च्या https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 या वेबसाइटवर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येते. Train Cancelled
रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट अशा प्रकारे चेक करा
IRCTC आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम या दोघांकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आता घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासता येईल. यासाठी सर्वांत आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, Exceptional Trains च्या पर्यायावर क्लिक केल्यावर रद्द केलेल्या तसेच रीशेड्यूल आणि डायवर्ट केलेल्या गाड्यांची लिस्ट मिळेल. Train Cancelled
रेल्वेमधील नोकरी विषयक माहितीकरता इथे भेट द्या : Railway Recruitment
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा