सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पहाटेच्या सुमारास कोल्हापुर ते पुणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका ट्रव्हल्समध्ये सोने चांदी याची अवैध पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार पहाटे आनेवाड़ी टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती. गाडीतील संशियातकडे असलेल्या गोणीमध्ये मंगळसूत्र, नेकलेस, ठुशी असे १३ लाख ७२ हजार ४०८ रूपये किमतीचे ३४ तोळे वजनाचे दागिने मिळून आले. तसेच चांदीचे एकूण ५५ किलो ६७१ ग्रैम वजनाचे दागिने सापडले आहेत. सोने व चांदीचे दागिने मिळून एकूण २९ लाख रूपयांचा ऐवज सापडला असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, आनेवाडी टोलनाका येथे नाकाबंदीमध्ये कोल्हापूरवरून पुणेकडे जाणारी सना ट्रव्हल्स क्रमांक (एम. एच- ०९- सी.व्ही- ३२९९) या गाडीची तपासणी करण्यात आली. तेव्हा या गाडीत एक संशयित प्रवाशी आढळून आला. राजवीर हणमंत तोमर (रा. शिवाजी चौक कोल्हापुर मूळ रा.सोहनर ता. नड़वाल जि. शिवपुरी मध्यप्रदेश) असे संशियाताचे नांव आहे. ट्रव्हल्सच्या गाडीच्या डिकीमधे पांढऱ्यां रंगाच्या दोन गोण्या आढळून आल्या आहेत. या बाबत गाडीचे चालक व वाहक यांच्या कड़े चौकशी केली असता. गाडीमधील प्रवासी याच्या असल्याचे समजले त्याच्याकड़े पोलिसांनी चौकशी केली असता. प्रथम त्याने उड़वाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी ख़ाकया दाखवताच सोने चांदी च्या मालाची कबूली दिली.
सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा