हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : वातावरणातील धुक्यामुळे रेल्वेच्या कामकाजात सातत्याने अडथळा येतो आहे. या दाट धुक्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये आजही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. आजही (3 जानेवारी रोजी) रेल्वेने 290 गाड्या रद्द केल्या आहेत. Train Cancelled
आज रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांपैकी 247 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या गेल्या आहेत तर 43 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वेला आज 24 गाड्यांचे वेळापत्रकही बदलावे लागले आहे. त्याच वेळी, 11 गाड्या त्यांच्या नियोजित मार्गांऐवजी इतर मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. Train Cancelled
ट्रेनचे स्टेट्स ऑनलाइन तपासा
रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती ऑनलाइन पुरवली जाते. रेल्वेच्या रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांची माहिती भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध असते. तसेच रद्द झालेल्या गाड्यांची माहिती NTES या App वरूनही घेता येईल. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटवर किंवा IRCTC च्या https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 या वेबसाइटवर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येते. Train Cancelled
रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट अशा प्रकारे चेक करा
IRCTC आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम या दोघांकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आता घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासता येईल. यासाठी सर्वांत आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, Exceptional Trains च्या पर्यायावर क्लिक केल्यावर रद्द केलेल्या तसेच रीशेड्यूल आणि डायवर्ट केलेल्या गाड्यांची लिस्ट मिळेल. Train Cancelled
रेल्वेमधील नोकरी विषयक माहितीकरता इथे भेट द्या : Railway Recruitment
हे पण वाचा :
Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले
‘या’ Post Office योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा 2500 रुपये
New Business Idea : टोमॅटो केचपच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Indian Overseas Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या