कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आज सकाळी 10 वाजून 31 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. माण तालुक्यातील पळशी- धामणी या ठिकाणी 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का झाला असून याची नोंद कराड भूकंप केंद्रात झाली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू माणपासून 5 किलोमीटर अंतरावर होता. याबाबत भूकंप मापक केंद्रातून माहिती देण्यात आली आहे. या भूकंपामुळे नुकसान झाले नसून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले. पळशी- धामणी येथे अचानक भूकंपाचा धक्का जाणवल्याने ग्रामस्थांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली.
सातारा जिल्ह्यात 3.6 रिश्टेल स्केलचा भूकंप pic.twitter.com/G437tPdxWd
— santosh gurav (@santosh29590931) February 26, 2023
दरम्यान आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमाराज झालेल्या भूकंपाचा कालावधी कमी असल्यामुळे त्याची तीव्रता जाणवली नाही. त्याची कराडच्या भूकंप मापन केंद्रात नोंद झाली आहे.