हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदा 350 वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर आज किल्ले रायगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिमाखदार असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. तसेच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर एक जबाबदारीही सोपवली आहे.
आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी रायगडमधे शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. यासाठी छत्रपती उदयनराजे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई येथील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला, त्या ऐतिहासिक सोहळ्याला आज 350 वर्षे पूर्ण झाली. अशा या राज्याभिषेक सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांचं काम कऱण्याची संधी आपल्याला मिळाली, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.