नवाब मलिकांच्या जामीनासाठी 3 कोटींची मागणी; मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी 3 कोटींची मागणी केल्याचा आरोप नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांनी करत ऍड. अमीर मलिक यांच्या साहाय्याने याप्रकरणी व्हीबी नगर पोलिसांनी इम्तियाज नावाच्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांच्या मुलाला इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला होता. त्याने फोन वर म्हटले की, ‘साहेबांना जामीन हवा असेल तर तीन कोटी रुपये द्यावे लागतील,’ असे फिरोज याने तक्रारीमध्ये म्हटले आहे.विशेष म्हणजे हे पैसे बिटकॉईन स्वरुपात मागण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी वकील आमीर मलिक यांनी विनोबा भावे नगर पोलिसात इम्तियाज नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे.

दरम्यान, डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मलिक यांचा राजीना

Leave a Comment