औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाच्या (घाटी) इलेक्ट्रिकल कामासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटींचा आराखडा तयार केला असून, 3 जानेवारी चा डीसीपी च्या बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वर्तवली आहे.
राज्यातील भंडारा, नाशिक, अहमदनगर येथील रुग्णालयांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयाचे फास्ट ऑडिट करण्यात आले. त्यात घाटीचा समावेश होता. त्यावेळी इलेक्ट्रिकल ऑडिट ही करण्यात आले. वीस वर्षांपर्यंत घाटीतील इलेक्ट्रिकल यंत्रणा अद्ययावत राहील, असे काम व्हावे यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी कॉलेज, एमआयटी या संस्थांची समिती स्थापन केली आहे.
सर्जिकल इमारतीचे काम लवकरच सुरू होईल. ओपीडी, महाविद्यालय, मेडिसिन इमारत व विद्युतीकरण सह इतर कामांना 19 कोटी रुपये लागणार आहेत. सध्या घाटीतील वीज पुरवठा करणारी यंत्रणा एकदम जुनाट झालेली आहेत. धोकादायक यंत्रणेवर घाटीतील ओटी, ओपीडी, एमआरआय, जुना नवजात शिशु विभागातील वीज पुरवठा यंत्रणा मोडकळीस आलेली आहे. केबल जुने झाल्या मुळे शॉर्टसर्किटच्या घटना ही वारंवार घडत असतात.