हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चक्क अंतर्वस्त्रांत लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना हैदराबाद कस्टमच्या पथकाने अटक केली आहे. या महिलांनी ब्रा, पॅंटी मध्ये लपवून दुबईतून मोठ्या प्रमाणात सोने आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या तीन महिलांकडून 3283 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत एक कोटी 72 लाख रुपये आहे.
कस्टम विभागाच्या पथकाला सातत्याने सोन्याच्या तस्करीची माहिती मिळत होती. विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद विमानतळावर एका महिला प्रवासिला तपासणीसाठी थांबवण्यात आले. झडतीदरम्यान तिच्याकडून सोने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे तिने हे सोने ब्रा, पेंटी आणि हेअरबँडमध्ये ठेवले होते. कस्टम विभागाच्या पथकाने या महिलेकडून सुमारे 234 ग्रॅम सोने जप्त केले आहे. ही महिला प्रवासी दुबईहून विमानाने हैदराबादला आली होती. तिची अधिक झाडाझडती घेतल्यानंतर आणखी दोन महिला संशयित सापडल्या. त्यांच्याकडूनही सोने जप्त करण्यात आले.
https://www.instagram.com/reel/CjfIKCRqZOY/?igshid=NDRkN2NkYzU=
याशिवाय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने तस्करीच्या आरोपाखाली दोघांना अटक केली आहे. कुवेतहून विमान पकडून दोन्ही पुरुष प्रवासी हैदराबादला पोहोचले होते. याठिकाणी त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यात सोन्याच्या दोन कड्या व बटणे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे एकूण वजन 855 ग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे. सीमा शुल्क विभाग आणि पोलीस पथक अटक केलेल्या सर्व आरोपींची चौकशी करत आहेत