कराड तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन; उसाच्या शेतात सापडली 3 पिल्लं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील वनवासमाची येथे उसाच्या फडात बिबट्याचे तीन पिल्लं सापडली. या प्रकारामुळे ऊसतोड मजुर आणि शेतकऱ्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी 2 वाजता ही 3 पिल्ले शेतकरी प्रशांत तुकाराम यादव यांच्या शेतात आढळली.

यांनतर या घटनेची माहिती तात्काळ कराड वनविभाग यांना दिले असता, वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ग्रामस्थही उपस्थित होते . आत्ता बिबट्याची ३ पिल्ले सापडली असून अजूनही इथे बिबट्याचा वावर आहे अशी माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं.

दरम्यान , कराड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर प्रामुख्याने उसाच्या शेतात मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळून येत आहे. अनेक गावात विविध ठिकाणी बिबट्या दिसला आहे. अनेक वेळा तर बिबट्याचे मनुष्य आणि प्राण्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचेही निदर्शनास आलं आहे. अशावेळी काहीतरे ठोस पाऊले उचलणे आवश्यक आहे.