Sign in
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
Thursday, March 6, 2025
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • Home
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • आर्थिक
  • शेती
  • खेळ
  • शिक्षण/नोकरी
  • लाईफस्टाईल
  • तंत्रज्ञान
Home आर्थिक EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्यावा...
  • आर्थिक
  • ताज्या बातम्या

EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्यावा ते पहा

By
Akshay Patil
-
Monday, 13 February 2023, 5:00
0
94
EPFO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Share on WhatsApp Share on Facebook Share on X (Twitter) Share on Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO म्हणजेच एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आपल्यामध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त देशातच नाही तर परदेशातही मदत करते. यासंदर्भात ईपीएफओने जगभरातील अनेक मोठ्या देशांसोबत करार करून तेथे कामासाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे. EPFO च्या या सुविधेचा लाभ सोशल सिक्‍योरिटी एग्रीमेंट अर्थात सामाजिक सुरक्षा कराराद्वारे (SSA) घेता येतो. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे.

EPFO alert! Are you aware of these top 5 benefits of Provident Fund? | Zee Business

हे जाणून घ्या कि, सोशल सिक्‍योरिटी एग्रीमेंट हा दोन देशांदरम्यान केलेला एक असा करार आहे, ज्याच्या अंतर्गत एका देशातील कर्मचार्‍याला त्याच्या देशात मिळणाऱ्या सर्व सामाजिक सुरक्षा दुसऱ्या देशातही उपलब्ध होतील. EPFO कडून भारतात पीएफ खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सामाजिक सुरक्षा दिल्या जातात. यामध्ये पेन्शनपासून ते मोफत उपचारापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे.

यासाठी काय करावे लागेल ???

जर आपल्यालाही परदेशात काम करून EPFO ​​च्या सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर आजच भारतातील आपल्या जवळच्या EPFO ​​च्या कार्यालयाशी संपर्क साधा. यानंतर सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज (CoC) घेऊन ते संबंधित देशात सबमिट करा. उदाहरणार्थ, जर आपण फ्रांसमध्ये काम करत असाल आणि तिथे पीएफ खात्याच्या सुरक्षिततेचा लाभ घ्यायचा असेल तर भारतात उघडलेल्या पीएफ कार्यालयाशी संपर्क साधून CoC मागवा. यामध्ये नाव, पत्ता, पासपोर्ट इत्यादी डिटेल्स सहीत, नियोक्त्याचा तपशील आणि आपण ज्या देशात काम करत आहात त्या देशाचे नाव आणि पत्ता द्यावा लागेल.

epfo

अशा प्रकारे डाउनलोड करा CoC फॉर्म

हा फॉर्म EPFO ​​च्या https://www.epfindia.gov.in/site_en/Operating_SSA.php या अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करता येऊ शकेल.

कोण-कोणत्या देशात उपलब्ध आहे सुविधा

हे जाणून घ्या कि, यासंदर्भात भारताने एकूण 19 देशांसोबत करार केला आहे. ज्यामध्ये दक्षिण कोरिया, नेदरलँड, हंगेरी, फिनलंड, स्वीडन, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे, ऑस्ट्रिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, लक्झेंबर्ग, फ्रान्स, क्यूबेक देशांचा समावेश आहे. याचाच अर्थ असा कि, आता या देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना तिथे EPFO ​​सुविधांचा लाभ घेता येईल.

Working abroad? Now get EPFO certificate of coverage online to escape social security contribution - The Economic Times

परदेशातही मिळणार पेन्शनचे फायदे

या योजनेंतर्गत या सोशल सिक्‍योरिटी एग्रीमेंटची निवड करणार्‍या खातेदारांना परदेशात पेन्शन सोबतच मोफत उपचारांचाही लाभ मिळेल. जर आपण फ्रांसमध्ये काम करत असाल आणि तेथे पेन्शन मिळवायची असेल तर EPFO ​​कडून या पर्यायांतर्गत ही सुविधा देखील पुरवली जाईल. इतकेच नाही तर हे पैसे परदेशात भरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देखील आकारले जाणार नाही.

दोन ठिकाणी पैसे जमा करण्याची गरज नाही

जर आपण भारतात उघडलेल्या पीएफ खात्यामध्ये योगदान देत असाल, तर या सुविधांचा लाभ घेण्यासाठी परदेशात पैसे जमा करण्याची गरज नाही. यासाठी आपल्याला फक्त सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज (CoC) घेऊन ते संबंधित देशामध्ये सबमिट करायचे आहे. म्हणजेच एकाच ठिकाणी पैसे जमा करून आपल्याला दोन देशांमध्ये पीएफचा लाभ घेता येईल. तसेच याअंतर्गत भारतात मिळत असलेल्या सुविधा परदेशात त्यापेक्षा कमी दिल्या जातील असे होणार नाही.

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

  • TAGS
  • epfo
  • EPFO account
  • EPFO subscribers
  • PF Account
Previous articleSatara News : पाचगणी-वाई रस्त्यावर चालत्या कारने घेतला पेट
Next articleमित्रांची पैज पडली महागात!! 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिल्याने व्यक्तीचा मृत्यू
Akshay Patil
Akshay Patil
https://hellomaharashtra.in/

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

medicines

सर्वसामान्यांना मोठा दिलासा!! आता या 53 औषधांच्या किमती झाल्या कमी

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan: Airtel चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन; Jio -Viला फटका बसणार

new virus

चीनमध्ये नव्या आजाराने थैमान!! अंत्यसंस्कारासाठी लोकांच्या रांगा, गावागावात नव्या स्मशानभूमींची उभारणी

  • About Us
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info
  • Grievance Redressal
©
  • Home
  • YouTube
  • Follow
  • WhatsApp