Tuesday, June 6, 2023

Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Saving Account : सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांच्या नावाने बँकेचे खाते उघडण्यास कचरत आहेत. मुलांनी खाते चालवण्यापेक्षा हे काम पालकांनी करावे, असे त्यांना वाटते. मात्र याबाबत बँकिंग तज्ञांचे मत वेगळे आहे. ते सांगतात कि, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या नावाने खाते उघडून त्यांना बँकिंगची माहिती दिली पाहिजे. यामुळे मुले पैशांच्या बाबतीत जास्त जागरूक होतील. याबरोबरच आपल्या आर्थिक गरजा चांगल्या पद्धतीने हाताळण्याची त्यांना सवय देखील होतील. याशिवाय मुलांच्या नावाने खाते उघडण्याचे इतर अनेक फायदे देखील आहेत.

Features & Benefits of Savings Account You Must Know | Bank of Baroda

SBI च्या वेबसाइट वरील माहिती नुसार, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलाच्या नावावर खाते उघडण्याऐवजी हे खाते पालकांच्या देखरेखीखाली उघडले जावे. हे खाते फक्त पालकच हाताळतील. तसेच वयाची 10 वर्षे पूर्ण झाल्यावर एक मायनर अकाउंट उघडता येईल, जे ते मूल स्वतः हाताळू शकेल. हे खाते कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेमध्ये मुलाच्या नावाने उघडता येईल.

या खात्यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ???

हे जाणून घ्या कि, या खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज देखील नाही. बँकाकडून या खात्यावर एटीएम, डेबिट कार्ड आणि चेकबुकची सुविधा देखील मिळते. मात्र यासाठी बँकेशी अगोदर बोलणी करावी लागेल. तसेच हे खाते उघडण्यासाठी मुलाचे नाव आणि पत्त्यासह, पालकाचे ओळखपत्र देखील द्यावे लागेल. तसेच काही बँका अशा खात्यांवर नेटबँकिंग पासवर्ड देत नाहीत, त्यामुळे याविषयी बँकेशी आधीच बोलणी करावी लागेल. Saving Account

Saving accounts features

18 वर्षांनंतर खात्याचे काय होणार ???

जोपर्यंत आपले मूल 10 वर्षांपेक्षा कमी आहे, तोपर्यंत फक्त त्याच्या पालकांनाच हे खाते हाताळता येईल. मात्र जर ते 10 वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तो स्वतः हे हाताळू शकेल. मात्र, व्हायची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर हे मायनर अकाउंट सामान्य बचत खात्यात रूपांतरित केले जाईल. Saving Account

या खात्यामध्ये किती पैसे जमा करता येतील ???

काही बँकांकडून अशा खात्यामध्ये 10 लाख रुपये जमा करण्याची सुविधा मिळते. मात्र बहुतांश बँकांमध्ये ही मर्यादा 10 ते 50 हजार रुपयांपर्यंतच आहे. मात्र जर मुलाचे खाते पालकांसह जॉईंटपणे उघडले असेल तर यामध्ये 10 ते 20 लाख रुपये जमा करता येतील. Saving Account

Bank accounts for children - how to maintain kids savings motivation

मायनर अकाउंटचे फायदे काय ???

मुलांचे खात्यामध्ये पैसे जमा करण्याबरोबरच इतरही अनेक फायदे आहेत. यामध्ये मुलांना मिळालेली शिष्यवृत्ती आणि बक्षिसाची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करता येतील. याबरोबरच मुलाला एटीएम आणि चेकबुकचा योग्य वापरही शिकवता येईल, जेणेकरून ते मोठे झाल्यावर त्यांना बँकिंगमध्ये कोणतीही अडचण जाणवणार नाही. Saving Account

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/accounts/saving-account/savings-account-for-minors

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या