ठाणे प्रतिनिधी | घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात गुरुवारी एका तीन वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी, तिचे वडील, आजी, आत्या आणि आत्याचा नवरा एकत्र राहत होते. गुरुवारी पीडित मुलगी घरात एकटी असताना तिच्या आत्याच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आजी घरी आल्यानंतर तिने आजीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आजीने याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सदर तक्रारीवरून कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा –
साखरपुडा झालेल्या तरुणीचे प्रियकराने मोटारसायकलवर येऊन केले अपहरण
अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल