‘मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो’…म्हणत प्रेयसीसमोर प्रियकराने केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरयाणामधील पानीपतमध्ये एका सर्वाइकल सेंटरच्या संचालकाने प्रेयसीला प्रेमाचा पुरावा देण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेयसी सेंटर संचालकाच्या पत्नीची नात्याने मावशी लागते आणि वयाने त्याच्यापेक्षा ८ वर्षाने मोठी आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. मॅनेजर ओरडण्याचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यानंतर तो रूमच्या बाहेर पोहोचला. पाच मिनिटांनंतर महिलेने दरवाजा उघडला तर त्याला सेंटर संचालकाचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्याने आपल्या मालकाला याची कल्पना दिली. यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी महिलेवर हत्येचा आरोप केला आहे.

शुक्रवारी दुपारी 2.17 वाजता करनालच्या रतनगढ येथील ३० वर्षीय सर्वाइकल सेंटर संचालकाने १०३ नंबरची रूम बुक केली होती. ३.१० वाजता पानीपतच्या पठाण मोहल्ल्यातील ३८ वर्षीय महिलेने आधार कार्ड दाखवत आधीच्या एन्ट्रीवर सही केली.दोघांचंही थांबण्याचं कारण आजार सांगण्यात आलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांना आराम करायचा आहे. त्यानंतर साधारण पाच वाजता रूममधून ओरडण्याचा आवाज आला.मॅनेजर धावत रूमजवळ गेला आणि महिलेच्या रडण्याचा आवाज त्याला आला. तिला दरवाजा उघडण्यास सांगितलं तर ती बाहेरूनच उघड असं सांगत टाळत राहिली.

यानंतर ५ मिनिटांनी तिने तिने दरवाजा उघडला. तेव्हा मृत व्यक्तीने महिलेच्या ओढणीने गळफास घेतलेला होता. तसेच महिला बेडवर बसून रडत होती. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता रूममध्ये दारूच्या बॉटल सापडल्या. मृत व्यक्तीने दारू प्यायल्यावर गळफास घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले कि पाच वर्षापूर्वी त्याचं एका तरूणीसोबत लग्न झालं होतं. त्यांना एक तीन वर्षांचा मुलगाही आहे.

Leave a Comment