3 किमीसाठी 3100 रुपये भाडे; पुण्यात रिक्षाचालकाने दिवसाढवळ्या लुबाडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एका रिक्षाचालकाने बंगलोरला जाणाऱ्या प्रवाशाची फसवणूक केली आहे. पद्मावती ते कात्रज या अवघ्या ३ किलोमीटर प्रवासासाठी ३१०० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर या प्रवाशाकडे पैसे नसल्याने संबंधित रिक्षा चालकाने त्याला ‘मनी ट्रान्सफर’च्या दुकानात नेऊन पैसे ट्रान्स्फर करुन घेतले.

सदर प्रवाशाला बेंगलोरला जायचे होत. हा रिक्षाचालक त्यांना कात्रज येथील दत्तनगर परिसरात घेऊन गेला. यावेळी रिक्षाचालकाने पद्मावती ते दतनगर दरम्यानच्या प्रवासाचे भाडे ३१०० रुपये झाल्याचे सांगितले. मात्र, त्या प्रवाशाकडे एवढे पैसे नव्हते. त्यानंतर त्याच्याजवळ असलेले १६०० रुपये रिक्षा चालकाने काढून घेतले आणि बाकीचे पसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी दुकानात घेऊन गेला. तेथून १५०० रुपये घेऊन रिक्षाचालक आणि त्याचा साथीदार पसार झाला.

याबाबत अधिक माहिती खुद्द मनी ट्रान्सफर करणारे दुकानदार बजरंग निंबाळकर यांनी दिली आहे. त्यानुसार, दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दुकानासमोर रिक्षा थांबली. त्यातून दोन जण बाहेर पडले आणि दुकानात आले. प्रवाशाने गुगल पेद्वारे निंबाळकर यांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये ट्रान्सफर केले. त्याबदल्यात निंबाळकर यांनी रोख रक्कम दिली. ही रक्कम घेऊन रिक्षाचालक निघून गेला, मात्र सदर प्रवासी मात्र दुकानात थांबला आणि आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल त्यांना सांगितले. परंतु याबाबदल कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नसून संबधित प्रवाशी हा बंगरुळूला निघून गेल्याची माहिती दुकानदाराकडून देण्यात आली.