पत्नीच्या छळाला वैतागून पतीने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 32 वर्षीय तरुणानं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण घटनेच्या एक महिन्यानंतर या मृत तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट सापडली यानंतर पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव महावीर उत्तम जगदाळे असे असून तो पुण्यातील लोणी काळभोर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी रजनी महावीर जगदाळे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत महावीर आणि रजनी याचं आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाली आहेत. दोघंही पती पत्नी मोल मजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होते. पत्नी देखील एका बांधकाम साईटवर काम करत होती. पण लॉकडाऊनच्या काळात पतीचं काम बंद झाल्यामुळे तो गावी निघून गेला होता.

गावावरून परत आल्यानंतरही तो कामावर जात नव्हता. गेली काही दिवस तो घरीच बसून होता. यामुळे रजनी यांनी आपल्या पतीची तक्रार सासऱ्यांकडे केली. तरीदेखील मृत महावीर कामाला जात नव्हता. यामुळे महावीर आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत भांडण होत होते. यातून पत्नी सतत आपल्या पतीला टोमणे मारू लागली. यानंतर आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून महावीर याने 8 नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.