व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रेमभंग झाल्यामुळे तरुणाचा रेल्वेवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमभंग झाला म्हणून रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न (suicide) केला आहे. या तरुणाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुणे गोरखपुर एक्सप्रेस सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर उभी होती. यावेळी याच ट्रेनचा प्रवासी असलेला 28 वर्षीय तरुणाने रेल्वेच्या डब्यांवर चढण्याचा प्रयत्न केला. त्याला 2 वेळा रेल्वे कर्मचाऱ्यांनी हटकले. परंतु तिसऱ्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर चुकवून हा तरुण गोरखपूर एक्सप्रेसच्या डब्यांवर चढला आणि त्याने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावला आणि आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला. या जखमी तरुणाला ससून रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गोवर्धन मल्ला असे या जखमी (suicide) तरुणाचे नाव आहे. त्याचे वय 33वर्षे आहे. तो मुळचा कटक शहरातील आहे. त्याच्याकडे विशाखापट्टनमचे तिकिट सापडले आहे. तो खेड तालुक्यातील खळ उंबरे या गावातील एका कंपनीत कामाला होता अशी माहिती समोर आली आहे. हि संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरून एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय