कराड | मर्चंट नेव्हीत भरतीच्या बहाण्याने आठ ते दहा युवकांची प्रत्येकी तीन लाखांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल होत आहेत. त्यात कराड तालुक्यासह आता सांगली जिल्ह्यातीलही काही युवकांची फसवणूक झाल्याचे समोर येत असून, आहे. फसवणुकीचा आकडा 35 लाखांकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
मर्चंट नेव्हीत भरती करण्याच्या बहाण्याने युवकांसह त्यांच्या पालकांना गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यातील एका पती- पत्नीसह सांगली जिल्ह्यातील संशयितांनी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक दीपज्योती पाटील यांचे पथक तत्काळ ठाण्याला तपासासाठी रवाना झाले. त्यांनी ठाण्यातून अमोल बाबा गोसावी याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. संबंधितास येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली
कराड तालुक्यातील नीलेश शेवाळे याच्या तक्रारीनंतर अन्य युवकांनीही आपलीही या प्रकरणात फसवणूक झाल्याचे वाटू लागले. त्यामुळे आता संबंधित प्रकरणात सांगली जिल्ह्यातील युवकांचीही फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असून, फसवणुकीचा आकडा 35 लाखांकडे गेल्याचे पोलिसांनी सांगितले.