हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रात देखील कोरोना झपाट्याने वाढत असून याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात पुन्हा ३६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत संचार बंदी करण्यात आली असून मागील आठवड्यात सुद्धा 36 तासांची संचारबंदी करण्यात आली होती.
दरम्यान संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापने बंद राहणार आहेत. संचारबंदीच्या काळात बस वाहतूक सुद्धा बंद राहणार आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’