खंडाळा, वाई तालुक्यातील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस, दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

खंडाळा व वाई तालुक्यातील घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. पथकाने 8 जुलै रोजी खंडाळा परिसरामध्ये जावून संशयितांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात अकेला थिमथिम्या भोसले आणि उमेश उर्फ उम्या इंजेश पवार (दोघेही रा. खंडाळा, ता. खंडाळा) अशी नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, खंडाळा व वाई तालुक्यातील घरफोडीच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने खंडाळा परिसरातील संशयितांचा शोध घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता, त्यांनी खंडाळा पोलीस स्टेशनच्या हददीत घरफोडीचे 2, वाई पोलीस स्टेशनच्या हददीत 1 तर भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 असे एकुण 4 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहा फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पो. हवा. कांतीलाल नवघणे, संतोष सपकाळ, संतोष पवार, पो.ना.शरद बेबले, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, रवि पाघमारे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, राजकुमार ननावरे, पो.कॉ. केतन शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, विक्रम पिसाळ, प्रविण पवार, बा.पो.कॉ.विजय सावंत, गणेश कचरे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाईमधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील यानी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment