गुगल मॅपच्या मदतीने लग्नाच्या 15 दिवसात तरुणीने केली पतीची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवविवाहितीने लग्नाच्या 15 दिवसात पतीची हत्या केली आहे. या महिलेचे चार वर्षांपासून दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. आपल्या पतीची हत्या करण्यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. हि घटना विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावामध्ये घडली आहे. पत्नी कृष्णा बाईनेच पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

या महिलेने प्रियकर शुभम याच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आहे. रात्री नवविवाहित जोडपे झोपले होते. त्यावेळी पत्नीने डाव साधत पतीची हत्या केली. पत्नीने हत्येदरम्यान आपण बेशुद्ध झाल्याचा पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच पत्नीवर संशय होता. पत्नीने पतीचे दोन्ही हात धरले आणि प्रियकराने पतीवर कुऱ्हाडीने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली.

नवविवाहित महिलेने लग्नाच्या 15 दिवसांनंतर पतीची निघृणपणे हत्या केली. हि आरोपी महिला एक दिवसापूर्वीच सासराच्या घरी आली होती. मागच्या चार वर्षांपासून या महिलेचे शुभम नावाच्या मुलावर प्रेम होते आणि याच कारणामुळे तिने आपल्या पतीचा जीव घेतला. पत्नीने हत्येचा बनाव रचून प्रियकराला घरी बोलावले. यावेळी प्रियकराने गुगल मॅपच्या मदतीने प्रेयसीचे घर गाठले. यानंतर या दोघांनी मिळून हि हत्या केली.

Leave a Comment