हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून भाजप नेते नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलवलं असून राणे यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जातं असून फक्त राणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल 4 खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातुन राज्यसभा खासदार डॅा. भागवत कराड आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनाही मोदी 2.0 मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच, रणजित निंबाळकर यांनाही केंद्रात स्थान मिळणार असल्याचे समजते. तर, बीडच्या खासदार प्रितम मुंडेंच्या नावाची केवळ चर्चाच झाल्याचे दिसून येते.