सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कराड तालुक्यातील टाळगाव येथे अवैध दारूविक्री करणारे 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच सदर आरोपींकडून एकुण 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी कराड तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ११/०५/२०२३ रोजी परिवक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक, श्री. कमलेश मीना यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कराड तालुक्यातील टाळगांव येथे अवैध दारु विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. त्याअनुषंगाने परि, सहा. पोलीस अधीक्षक श्री. कमलेश मीना व त्यांचे पथकाने टाळगांव हद्दीमध्ये हॉटेल गावरान समोर सापळा लावला असताना त्याठिकाणी एका दुचाकीवरुन दोन इसम दोघांचे मध्ये असलेल्या पोत्यामधुन काहीतरी घेवून जात असल्याचे दिसले, म्हणून पथकातील अंमलदार यांनी सर इसमांना थांबवून त्यांच्याकडील पोत्याची पहाणी केली असता त्यामध्ये दारुच्या बाटल्या दिसुन आल्या. सदर दारूच्या बाटल्यांसंदर्भात त्या दोन्ही इसमांकडे परवाने मिळुन आले नाहीत.
तसेच यानंतर टाळगांव हद्दीतीलच हॉटेल फुल टू ढाबा येथे छापा टाकला असता तेथे दोन इसमां कडेला पुठयाच्या बॉक्समध्ये दारुच्या बाटल्या आढळून आल्या. त्या दारुचे बाटल्याबाबत त्या दोन्ही इसमांकडे परवाने मिळुन आले नाहीत. असे एकंदरीत टाळगांत येथे बेकायदा बिगर परवाना चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने देशी -विदेशी दारूची विक्री करत असताना एकुण ४ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन एकुण 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त किंमतीचा आला तसेच याबाबत कराड तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक, श्री कमलेश मीना, पा.हवा. मंगेश महाडीक, पोहवा. मुल्ला, पोलीस नाईक सर्वत, पो. कॉ. कदम, स्था.गु.शा. सातारा, पोहवा राजे, पोकों. हसबे कराड तालुका पोस्टे यांनी सदरची कारवाई केली असून सहभागी अधीकारी व पोलीस अंमलदार यांचे श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.