सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहर पोलीस ठाणेचे हद्दीतील वनवासवाडी (ता. जि. सातारा) याठिकाणाहून मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सातारा डी. बी. पथकातील पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चाैकशीत या युवकाने 4 मोटारसायकली चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अभिजीत भरत पवार (वय- 28, रा. शेरेवाडी, ता. माण) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकास मोटारसायकल चोरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. शेरेवाडी (ता. माण जि. सातारा) येथील एक युवक हा सातारा शहर परिसरातून मोटारसायकल चोरी करीत असतो. यावरून सदर युवकावर डी. बी. पथकाने पाळत ठेवून त्यास ताब्यात घेतले. त्याचेवर कोरेगाव, पुसेगाव तसेच सातारा शहर पोलीस ठाणेस यापूर्वी गुन्हे दाखल असून त्याचेकडे सातारा शहर पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील चोरीची मोटारसायकल मिळून आली आहे. सदरची मोटारसायकल पोलीसांनी जप्त करून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सातारा शहरामधून वेगवेगळया ठिकाणाहून अजून 3 मोटारसायकली चोरी केल्या असल्याचे सांगितले. पोलीसांनी एकूण 90 हजार रुपये किंमतीच्या 4 मोटारसायकली पोलीसांनी हस्तगत केलेल्या आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजिय बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक श्रीमती वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अमय साबळे, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, दादा दगडे, मपोना. वर्षा शिंदे यांनी केलेली आहे.