फ्रेशर्ससाठी 40 लाखांचा पॅकेज! Resume न घेता, फक्त कौशल्यावर भर देणारी ‘ही’ कंपनी

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात, अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो कारण नोकरी मिळवायची म्हटली की शिक्षण चांगल असायला हवं. कामाचा अनुभव असायला हवा. तुमचा रेज्युमे चांगला असावा. या आणि अशा अनेक कारणांमुळे तरुणांना नोकरी मिळविण्यासाठी अडचण येत असते. पण जर कामाचा अनुभव नसेल आणि तुमच्याकडे रेज्युने नसला तरी कोणी तुम्हांला चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी देत असेल तर ? होय, एक मोठी नामांकित कंपनीने 40 लाखाच पॅकेच देवू तेही रेज्युम नसला तरी चालेल असं सांगितले आहे. पण ही नेमकी कंपनी कोणती आहे? आणि जॉबसाठी काही अटी आहेत का ? तेच सविस्तर जाणून घ्या.

एक्स अकाऊंटवरील ट्विट –

काही दिवसांपूर्वी एक्स अकाऊंट वर कंपनीचे मालक सुदर्शन कामत यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी नोकरी संदर्भातील थोडक्यात माहिती दिली आहे. ट्विट मध्ये दिलेल्या माहितीनुसार कंपनी cracked full-stack engineer च्या शोधात आहे. म्हणजेच रिअल टाइम एआय तयार करण्यासाठी हे इंजिनिअर्स हवे आहेत. त्याचबरोबर सॅलरी CTC 40 लाखापर्यंत दिला जाणार आहे. तसेच आठवड्यातून 5 दिवस घरून काम आणि शनिवार, रविवार सुट्टी. नोकरीसाठी फ्रेशर्स पासून दोन वर्षांचा अनुभव असलेलं कोणीही अर्ज करु शकता. तुम्ही कुठल्या कॉलेज मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे हे महत्वाचे नाही तसेच रेज्युमेची गरज नाही असे देखील त्यात लिहिण्यात आले आहे.

स्मॉलेस्ट डॉट एआय कंपनी –

एवढ मोठ पॅकेज देणारी ही कंपनी मूळची कॅलिफॉर्नियामधील असून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात तिचे काम आहे. याच कंपनीची बंगळूर मधील शाखेत जॉबची संधी उपलब्ध झाली आहे. या कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामत यांनी स्वतः ट्विट करून या जॉब संदर्भातील माहिती दिली आहे.

महत्वाची अट –

ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार तुम्हांला जर या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर फक्त तुमच इंट्रोडक्शन 100 शब्दांमध्ये लिहून पाठवायच आहे. त्यासोबतच तुमच्या कामासंदर्भातील एक नमूना कंपनीला पाठवणे आवश्यक आहे. info@smallest.ai. या इमेल आयडीवर इच्छूकांनी संपूर्ण माहिती पाठवावी असं आवाहन करण्यात आले.

सुदर्शन कामत यांनी दिलेली जॉबची ऑफर ही आत्तच्या नोकरीच्या तुटवड्यात खूपच महत्वाची तर मानली जातीय पण काही लोकांच म्हणण आहे की ‘रेझ्युमेपेक्षा कौशल्याला प्राधान्य दिलं जातंय हे चांगलं आहे,’ तसेच एकाने म्हटले की “हे फारच भन्नाट असून भविष्यात अशाच पद्धतीने नोकऱ्या ऑफर केल्या जातील,”