हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर आज सुटका करण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. गेल्या 17 दिवसांपासून 41 मजूर बोगद्यात अडकले होते. तेव्हापासून या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून धडपड सुरू होती. उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर आज या सर्व मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
आज बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. सध्या या बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिकांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच, तात्पुरते रुग्णालय देखील उभारण्यात आले आहे. सुरुवातीला रेस्क्यू ऑपरेशनमार्फत दोन मजूरांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर एक एक करत सर्व मजुरांची बोगद्यातून सुटका करण्यात आली.
#WATCH उत्तराखंड में 12 नवंबर से सिल्कयारा सुरंग के अंदर फंसे सभी 41 मजदूरों को सफलतापूर्वक बाहर निकाला गया। सिल्कयारा सुरंग स्थल से एम्बुलेंस रवाना हुई है। pic.twitter.com/C5IHGW5qtk
— ANI_HindiNews (@AHindinews) November 28, 2023
दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी गोठवणाऱ्या थंडीत उत्तरकाशी मध्ये 41 मजूर बोगद्यात खणण्याचे काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि त्यात हे 41 मजूर अकडले. या मजुरांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने सर्व पातळीवर यंत्रणा कामाला लावली होती. तसेच संपूर्ण देशाचे लक्ष रेस्क्यू ऑपरेशनकडे लागून राहिले होते. हा सर्व घटनाक्रम गेल्या 17 दिवसांपासून सुरू होता. मधल्या काळात
यंत्रणांच्या मदतीने अन्न पाणी मोबाईल आणि आवश्यक असणाऱ्या वस्तू पाठवण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा या मजुरांच्या सुटका करण्यासाठी यंत्रणा जोमाने कामाला लागली. अखेर आज सर्व मजूर बोगद्यातून बाहेर आले आहेत.