औरंगाबाद – कोरोना काळात तुम्हाला जेवण पुरवण्याचे कंत्राट देऊ त्यासाठी 70 ते 80 लाख डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील असे म्हणत दोघांनी शहरातील हॉटेल चालकाची 41 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रजनी रानमारे आणि संदीप बाबुलाल वाघ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भक्तबंधु रामचंद्र पाढी हे शहरात शहरात एक हॉटेल चालवतात. पाढी यांना जानेवारी 2021 पासून रजनी आणि संदीप यांनी आर. बी. केटरर्स व फुड सप्लायर्स या नावाने 12 स्वरूप निकेतन, बामणवाडा, अंधेरी येथे फुड सप्लाय ची फर्म आहे. त्याद्वारे महाराष्ट्रभर मोठ-मोठ्या सरकारी कार्यालय तसेच रुग्णालयांच्या कॅन्टिनला फुड सप्लायचे टेंडर घेऊन त्यांना जेवण पुरवण्याचे काम करतो, तुम्ही जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे चार हजार लोकांना जेवण पुरवण्याचे काम करणार का ? तसेच कोरोना काळात आम्ही तुम्हाला जेवण पुरवण्याचे काम देऊ असे आश्वासन दिले होते. तसेच यासाठी डिपॉझिट म्हणून तुम्हाला 70 ते 80 लाख रुपये द्यावेल लागतील, असे सांगत पाढी यांचा विश्वास संपादन केला. तेव्हापासून 30 जानेवारी पर्यंत दोन्ही आरोपींनी 41 लाख पाच हजारांची फसवणूक केली.
पाढी यांनी दोघांकडे पैशांची मागणी केली असता पैसे देण्यास टाळाटाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यामुळे पाढी यांना आपली फसवणुक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे धाव घेत रजनी आणि संदीप यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.