शिवाजी विद्यापीठाचा 41 वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाचे गेली ४० वर्षे सातत्याने संयोजन करीत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठात जिल्हानिहाय महोत्सव होत असतात. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने बुधवार २२ डिसेंबर रोजी ४१ वा आंतरमहाविद्यालयीन सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे यजमानपद भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास प्राप्त झाल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांचा युवा महोलाव ऑनलाईन झाला. यंदाचा युवा महोत्सव कोरोना नियमावलीच्या अनुषंगाने हा युवा महोत्सव ऑफलाईन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातील १००० हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होणार आहेत.

बुधवार 22 रोजी सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोगले, शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य संदीप परमणे, विशाल गायकवाड या सन्माननीय मान्यवरांच्यासहित विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, पदाधिकारी यांची उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे.

Leave a Comment