पाटण तालुक्यात 41 गावातील 42 किलोमीटर शेत/ पाणंद रस्ते मंजूर : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती. शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुसऱ्या टप्प्यात पुनश्च: मतदारसंघातील 41 गावात सुमारे 42 कि. मी. लांबीच्या शेत/ पाणंद रस्त्यांची कामे ही मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचेकडे शिफारस केली होती. त्यास मंजूरी देण्यात आली आहे.

पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीचे मशागतीचे साहित्य, शेत मालाची वाहतूकीसाठी शेत पाणंद रस्त्यांची सुविधा नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याकरीता शासनाच्या  मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजने अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी शेत/ पाणंद रस्त्यांच्या आराखडा तयार करण्यासंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना करीत या रस्त्यांच्या कामांच्या शिफारशी राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचेकडे केलेल्या शिफारशीनुसार दुसऱ्या टप्प्यात या 41 गावांतील शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांचा समावेश करुन या कामांना मंजूरी दिली आहे.

शेत/ पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये प्रत्येक गांवाना एक किलोमीटरप्रमाणे पाणंद रस्त्यांची कामे देण्यात आली आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे

आबदारवाडी ऊरुल घाट आबदारवाडी ते मल्हारपेठ पाणंद रस्ता, गव्हाणवाडी खरेदी ते सुळेवाडी रस्ता, सोनवडे स्मशानभूमी ते शिव रस्ता, आडूळपेठ कराड चिपळूण रोड ते मळा रस्ता, बेलवडे खुर्द मळीचा माळ ते धावर पूल रस्ता, दिवशी बु.वाडी घाटदरा ते पडशिवार पाणंद रस्ता, टेळेवाडी पडेवाडी शिवार ते काळवट सनद रस्ता, जानुगडेवाडी मंद्रुळकोळे खुर्द ते मदनेवस्ती रस्ता, पवारवाडी कुठरे पवारवाडी ते सर्व्हे नं. मळा रस्ता, काढणे बौध्दवस्ती काढणे ते शिव रस्ता, मंद्रुळहवेली म्हारवडा मुलाणकी ते पानस्करवाडी रस्ता, नवसरी चावर रस्ता, येराडवाडी ठाणमपट्टी रस्ता, जमदाडवाडी शिरचा रस्ता, मुरुड मुरुड ते तोंडोशी पूल रस्ता, डेरवण डेरवण फाटा ते आंब्रुळकी रस्ता, मुळगाव डोंगरुबा मंदिर ते नदीकाठ रस्ता, त्रिपुडी नायकवडा ते आंबाटेक रस्ता, सांगवड म्हसोबा ते गडकर रस्ता, हावळेवाडी हावळेवाडी ते जखिण रस्ता, येराड येराड ते काळू माळ रस्ता खडीकरण, येराड रामाचावाडा ते जोतिबाचीवाडी रस्ता, वेताळवाडी  ते इरिगेशन रस्ता, बनपेठवाडी पाटण कराड चिपळूण रोड ते कुकुरटेक रस्ता, बनपेठवाडी कराड चिपळूण रोड ते जानाईचावाडा रस्ता, चोपदारवाडी सरकारी दवाखाना ते बिगा रस्ता, मल्हारपेठ ते दिंडूकलेवाडी व मल्हारपेठ ते नारळवाडी रस्ता, कडवे बुद्रुक बेंदवाडी ते माळवाडी कडवे बुद्रुक रस्ता, नविवाडी (जिंती) नविवाडी जिंती  ते कारळे फाटा रस्ता, बनपूरी पेठबनपूरी ते बाचोली रस्ता, कसणी निनाईवाडी जि.प शाळा ते पाणवटा रस्ता, साबळेवाडी मालदन साबळेवाडी सळवे रस्ता, शेडगेवाडी विहे रस्ता खडीकरण, मालोशी मालोशी येथे रस्ता, मत्रेवाडी निवास मत्रे यांचे घर ते भवानी देवस्थान रस्ता, मारुलहवेली धंद शिवार बेंद ते कारखाना रस्ता रस्ता, गव्हाणवाडी पायरन ते गतकुळी रस्ता, मुरुड मुरुड ते मळवी रस्ता, बहुले बहुलेश्वर देऊळ ते बेंद रस्ता, मालदन  ते साबळेवाडी रस्ता, येराड ते तामकडे रस्ता या कामांचा समावेश आहे.

Leave a Comment