वंचित आघाडी राज्यांतील 47 लोकसभेच्या जागा लढणार!! प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राज्यातील सर्व 47 जागा लढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तर खुद्द प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून निवडणूक लढणार आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे की, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आगामी निवडणुकीत सर्व 47 लोकसभेच्या जागा लढवणार आहे. तसेच ते स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. कालच प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी ईद-ए-मिलादनिमित्त अकोल्यातील शिवनी भागातून निघणाऱ्या जुलूसमध्ये सहभाग नोंदवला होता. आता ऑक्टोबर महिन्यापासून प्रकाश आंबेडकर यांचा महाराष्ट्रात दौरा देखील सुरू होणार आहे.

दरम्यान, नुकतीच प्रकाश आंबेडकर यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यांवर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी, “VBA लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे आणि ऑक्टोबरपासून मी राज्याचा दौरा करणार आहे. मी स्वतः अकोल्यातून निवडणूक लढवणार आहे. आमचा पक्ष विरोधी आघाडी स्थापन करण्यास उत्सुक होता. आमची बाजू मांडून आम्ही त्या दिशेने पावले टाकली होती. बिगर भाजप आघाडी आमच्या मनात होती” अशी स्पष्ट भूमिका मांडली.