दहिवडी | दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जनावरे चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते, त्या अनुषंगाने अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिस पथकाने चोरीला गेलेल्या 10 जनावारांसह पाचजणांना अटक केली असून 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, जनावरांची ओळख पटवून संबंधित मालकांना त्यांची जनावरे परत केली.
या प्रकरणात सागर जालींदर पाटोळे (वय- 28, रा. वेजेगाव ता. खानापूर जि. सांगली), भगवान ज्ञानदेव चव्हाण (वय- 60, रा. हतीत, ता. सांगोला जि.सोलापूर), संतोष छगन चव्हाण (वय- 25, रा. आंधळी, ता. माण जि. सातारा), संजय माणिक अडके (वय- 35, रा. आंधळी, ता. माण जि. सातारा), राजेंद्र छगन चव्हाण (वय- 40, रा. आंधळी ता.माण जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजकुमार भुजबळ, स. फौ प्रकाश हांगे, स.फौ अशोक हजारे, पो.हवा.संजय केंगले, पो.ना.रविंद्र बनसोडे, पो.ना.सजगने, पो.कॉ प्रमोद कदम व होमगार्ड तानाजी मुळीक यांच्या पथकाने केली. तपास पो. हवा. संजय केंगले करत आहेत.