हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Loan : सोने हे भारतीय लोकांच्या गुंतवणुकीचे सर्वांत आवडीचे साधन आहे. सोने हे अडचणीच्या काळातही खूप फायदेशीर ठरते. कारण अडचणीच्या काळात अनेकदा आपल्याला पैशांची गरज भासते आणि कधी कधी अशा प्रसंगी पैशांची व्यवस्था करणे देखील जड जाते. अशा परिस्थितीत गोल्ड लोन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
अशा संकटामध्ये अनेक मोठ्या बँका आणि नॉन बँकिंग फायनान्सिंग कंपन्यांकडून (NBFCs) गोल्ड लोनची सुविधा मिळेल. मात्र, गोल्ड लोन हे लगेच मिळत असले तरी त्यावरील व्याजदरही जास्त असतो. गोल्ड लोन इतर कर्जाच्या तुलनेत खूपच कमी वेळेत मंजूर होते. चला तर मग आज आपण कमी व्याजदरात गोल्ड लोन देणाऱ्या 5 बँकांबाबत माहिती जाणून घेउयात…
खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेकडून 7.60 टक्के ते 16.81 टक्के दराने Gold Loan मिळेल. मात्र यामध्ये डिसबर्सल अमाउंटच्या 1% रक्कम प्रोसेसिंग फीस म्हणून भरावी लागेल.
युको बँकेकडून 7.40 टक्के ते 7.20 टक्के दराने Gold Loan मिळेल. यामध्ये 250 ते 5000 रुपयांपर्यंत प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7.10 टक्के ते 7.20 टक्के व्याजदराने Gold Loan देत आहे. यामध्ये कर्जाच्या रकमेच्या 0.75 टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून भरावी लागेल.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, युनियन बँक ऑफ इंडिया 7.25 टक्के ते 7.50 टक्के व्याजदराने गोल्ड लोन देत आहे.
इंडियन बँक आपल्या ग्राहकांना 7 टक्के फ्लोटिंग व्याजदराने Gold Loan देत आहे. प्रोसेसिंग फी मंजूर केलेल्या लिमिटच्या 0.56 टक्के आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/borrow/loan-against-assets/gold-loan/fees-and-charges
हे पण वाचा :
SBI च्या झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंटद्वारे फ्रीमध्ये मिळवा ‘या’ 4 सेवा !!!
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
Amazon वरील Oppo Fantastic Sale मधून स्वस्तात घरी आणा Oppo चे ‘हे’ स्मार्टफोन
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Recharge Plan : मोबाईल युझर्सना धक्का !!! पुन्हा एकदा महागणार रिचार्ज प्लॅन