पेट्रोल स्कूटर खरेदीसाठी ‘हे’ 5 आहेत सर्वोत्तम पर्याय, जाणून घ्या किंमत आणि मायलेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Affordable Petrol Scooters : देशात मोठ्या प्रमाणात लोक पेट्रोल स्कूटर खरेदी करतात. तसे पाहिले तर देशात इलेक्ट्रिक स्कूटर आल्यापासून ग्राहकांनी पेट्रोल स्कूटर खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मात्र जर तुम्ही पेट्रोल स्कूटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आम्ही 5 सर्वात चांगले पर्याय सांगणार आहे, यातून तुम्ही तुम्हाला आवडेल ती पेट्रोल स्कूटर निवडू शकता.

Hero Destini Prime

ही स्टायलिश स्कूटर सध्या फक्त 1 प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. ही स्कूटर 45 kmpl चा मायलेज देते. या स्कूटरची पॉवर 9 bhp आहे. स्कूटरचे वजन 115 किलो आहे. हिरो डेस्टिनी प्राइममध्ये 124.6 सीसी हाय पॉवर इंजिन आहे. तसेच यात 5 लिटरची इंधन टाकी आहे. ही स्कूटर अलॉय व्हीलसह येते. त्याच्या बेस मॉडेलची किंमत 75972 रुपये आहे. स्कूटरमध्ये आरामदायक सिंगल सीट डिझाइन आहे.

TVS Scooty Pep Plus

या TVA स्कूटरचे वजन केवळ 93 किलो आहे, ते रस्त्यावरील वृद्ध आणि घरातील महिला सहजपणे हाताळू शकतात. घराच्या आसपासच्या रोजच्या कामांसाठी यात 4.2 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. स्कूटरच्या सीटची उंची 768 मिमी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे कमी उंचीचे लोकही ती सहजपणे चालवू शकतात. TVS Scooty Pep Plus 65561 रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. यात 87.8 cc चे इंजिन आहे.

Honda Dio

देशातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आवडीची असणारी ही स्कूटर आहे. याचे बेस मॉडेल 74234 हजार रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये दिले जात आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर रस्त्यावर 48 kmpl मायलेज देते. Honda Dio ला लांब मार्गांसाठी 5.3 लीटरची बूट स्पेस आहे. स्कूटर 7.75 bhp पॉवर जनरेट करते. स्कूटरचे एकूण वजन 103 किलो आहे. होंडाच्या या स्कूटरमध्ये 109.51 सीसी इंजिन आहे. यात अलॉय व्हील्स आहेत.

Suzuki Access 125

जर तुम्हाला जास्त अंतराचा प्रवास हा आरामात करायचा असेल तर तुमच्यासाठी या स्कूटरला टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन देण्यात आले आहे. ही पेट्रोल स्कूटर शक्तिशाली 124 सीसी इंजिनसह येते. Suzuki Access 125 82203 हजार रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. हे ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक दोन्ही पर्यायांसह येते. ही अप्रतिम स्कूटर 46 kmpl चा मायलेज देते. यात 5 लीटरची इंधन टाकी आणि 8.6 bhp पॉवर आहे.