हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IT Industry मध्ये इतर उद्योगांपेक्षा जास्त पगार दिला जातो. जर या कंपन्यांनी कनिष्ठ स्तरावरील कर्मचार्यांना इतर इंडस्ट्रीजपेक्षा चांगला पगार दिला, तर या कंपन्यांमधील सीईओचा पगार निःसंशयपणे वाढेल हे उघड आहे. चला तर मग आज आपण भारतातील पाच टॉप आयटी कंपन्यांच्या सीईओंना दिल्या जाणाऱ्या पगाराबद्दलजाणून घेउयात …

टेक महिंद्राचे सी.पी. गुरनानी- 2021-22 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 189 टक्क्यांनी वाढून 63.4 कोटी रुपये झाले आहे. कंपनीच्या वार्षिक रिपोर्ट नुसार, त्यांना मोबदला म्हणून पगार, स्टॉक आणि सर्व्हिस संपल्यानंतर एक वर्षापर्यंत पुरविलेल्या सुविधांचा समावेश होतो. IT Industry

TCS चे राजेश गोपीनाथन- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांना 2021-22 या आर्थिक वर्षात 25.75 कोटी रुपयांचे मानधन मिळाले. कंपनीच्या वार्षिक रिपोर्ट नुसार त्यांच्या उत्पन्नात 26.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. IT Industry

इन्फोसिसचे सलील पारेख- इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 71.02 कोटी रुपये पगार मिळाला. कंपनीच्या बोर्डाने त्यांचा कार्यकाळ आणखी 5 वर्षांसाठी म्हणजेच 2027 पर्यंत वाढवला आहे. यासोबतच त्यांचा देखील पगार 79.75 कोटी झाला आहे. IT Industry

HCL चे C. विजयकुमार- त्यांना 2021 मध्ये एकूण 123.13 कोटी रुपये (16.5 लाख डॉलर्स) उत्पन्न मिळाले. कंपनीने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. त्यांची बेसिक सॅलरी 2 मिलियन डॉलर होती. तसेच त्यांना आणखी दोन लाख डॉलर्स व्हेरिएबल पे अंतर्गत मिळाले. त्याच वेळी, त्यांना इतर बेनिफिट्सद्वारे $ 20,000 मिळाले. त्यांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा भाग सुमारे $125 लाख लॉन्ग टर्म इन्शेंटिव्ह्समधून मिळाला. IT Industry
)
विप्रोचे थियरी डेलापोर्ट – त्यांना 2021-22 या आर्थिक वर्षात वार्षिक उत्पन्न म्हणून 79.8 कोटी रुपये ($ 1.05 लाख) मिळाले. थियरी यांना जुलै 2020 मध्ये विप्रोचे सीईओ बनवण्यात आले आणि त्यांचे आर्थिक वर्ष 21 चे उत्पन्न 64 कोटी रुपये होते. IT Industry
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.wipro.com/leadership/thierry-delaporte/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज जोरदार उसळी !!! नवीन दर पहा
31 जुलैपर्यंत ITR भरा; अन्यथा होईल ‘इतका’ दंड
एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे Virat Kohli कमावतो ‘इतके’ पैसे !!!
Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!




