Instagram वरील प्रेमात 5 लाखाच्या खंडणीची मागणी : युवतीला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन 5 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका युवतीचाही समावेश आहे. अवघ्या बारा तासात पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने जेरबंद केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी दि. 2 जुलै व रविवार 3 जुलै रोजी दरम्यान instagram वर ओळख झालेल्या पूजा गोस्वामी (वय- 21 रा. पुणे) या मुलीने फिर्यादी कमलेश स्वामी याला सातारा रेल्वे स्टेशन येथे बोलावून घेतले. या दोघांची इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. तिच्यासोबतच्या तीन अनोळखी युवकांनी फिर्यादीस ओमनी कारमध्ये बसून मुलीचा विनयभंग केला असल्याचे म्हणत तक्रार करण्यासाठी पाच लाखाची खंडणी दे, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीला चाकूने धाक दाखवून बनावट पिस्टलने धमकी दिली व मोबाईलच्या पेटीएमॲपमधून 64 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. तसेच त्याच्याजवळ अडीच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेने या तक्रारीची नोंद करून घेतली होती.

सदर गुन्हा गंभीर स्वरूपात असल्याने स्थानिक गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि त्यांच्या पथकाने अतिशय पद्धतशीरपणे तपास सुरू केला. यासाठी पोलिसांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन गुन्ह्याची पद्धत समजावून घेतली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे रहिमतपूर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन पुण्यातील आरोपींना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेला चाकू, पिस्टल व सिगरेट सारखा दिसणारा लायटर, जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल मोबाईल हँडसेट, इतर चार मोबाईल हँडसेट, रोख रक्कम असा ऐकून दोन लाख 54 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. खंडणी आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा अवघ्या बारा तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. या तपासामध्ये उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार सतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, विक्रम पिसाळ, स्वप्निल माने, स्वप्निल दौंड , शिवाजी भिसे, सचिन ससाणे , पंडित निकम यांनीही कारवाई केली.