बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले, 3 जण अजूनही बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – राज्यात काही ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. काही ठिकाणी नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना (5 persons washed away with tractor) समोर आली आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून (5 persons washed away with tractor) गेल्याची घटना घडली आहे. यामधील 2 जण वाचले आहेत तर 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत.

पुलावरुन पाणी वाहत असतानाही ट्रॅक्टर पाण्यात घालणे यांच्या जीवावर बेतले (5 persons washed away with tractor) आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण या ठिकाणी हि घटना घडली आहे.अक्षय रामटेके आणि नारायण परतीकी या दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे तर सुरेंद्र डोंगरे, शेषराव चावके, मारोती चावके हे तिघे वाहून गेले आहेत. त्यांचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही.

काय घडले नेमके ?
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण येथून बेंबळा नदी वाहते. या नदीला पूर आला. ट्रॅक्टर चालकाला पुलावरून जाता येईल, असं वाटलं. त्यामुळं त्यानं पाच जण ट्रॅक्टरवर बसलेले असताना ट्रॅकर पुलावरून (5 persons washed away with tractor) काढला. पण, पुराच्या पाण्यामुळं त्याला पुलाचा अंदाज आला नाही. पुलाला कठडे नसल्यामुळे ट्रॅक्टरचा तोल गेला आणि तो नदीत बुडाला. यामधील दोघेजण कसेतरी बाहेर आले मात्र बाकी तिघेजण पुराच्या पाण्यात वाहून (5 persons washed away with tractor) गेले.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर