सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पुणे- बंगलोर महामार्गावर असलेल्या वाढे फाटा येथे लागलेल्या भीषण आगीत 5 दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जवळपास 3 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात सातारा नगरपरिषदेच्या अग्निशामक यश आले आहे. आगीने राैद्ररुप धारण केल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
सातारा शहराच्या बाहेरून महामार्गावर ही आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच सातारा पोलिस व सातारा नगरपरिषदेच्या 3 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अद्याप सुरू आहे. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.
साताऱ्यात महामार्गावर 5 दुकाने भीषण आगीत जळून खाक pic.twitter.com/MDNuVoDm43
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) January 11, 2023
या आगीमध्ये दोन टायरची दुकान, इलेक्ट्रॉनिकचे दुकान, हॉटेल, चप्पल- बूट दुकान या सर्व दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग नेमकी कशाने लागले हे मात्र, अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.