- Advertisement -
टीम, HELLO महाराष्ट्र। सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांप्रमाणेच एक चिमुरडीही मुख्यमंत्र्यांच्या मदतीची अपेक्षा करत आहे. या संदर्भात तिने मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहले आहे.
श्रेया हराळे या पहिलीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या बापाची व्यथा मांडली आहे. ‘माझ्या पप्पांचा पगार वाढवा मग मला चांगले शिक्षण मिळेल, पगार कमी असल्याने त्यांना ओव्हर टाइम करावा लागतो अशी व्यथा या चिमुरडीने पत्रात मांडली आहे.
एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न अनेकदा समोर आलेला आहे. त्यासाठी अनेक आंदोलनेही झाली. पण आता या चिमुरडीने केलेल्या निरागस मागणीने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे श्रेयाची मागणी मुख्यमंत्री मान्य करणार का? हे औत्सुक्याचे ठरणार आहे.