औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा तडफडून मृत्यू (5 year old boy dies) झाला आहे. कुटुंबातील सदस्यांनी सदर लहानग्या मुलाकडे लक्ष दिल्याने हि घटना घडली आहे. या चिमुकला खेळता खेळता वरणाच्या पातेल्याकडे गेला आणि त्यामध्ये (5 year old boy dies) पडला. वरण एकदम गरम असल्याने त्याच्या अंगाचे पूर्ण कातडे निघाले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
उपचारादरम्यान झाला मृत्यू
सविस्तर माहिती अशी कि, योगीराज नारायण आकोदे असे वरणात पडून मृत्यू झालेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचे (5 year old boy dies) नाव आहे. योगीराज वरणाच्या भांड्यात पडल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तातडीने वरणाच्या भांड्यातून बाहेर काढण्यात आले.आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच या चिमुकल्याचा मृत्यू झाला.
घरच्यांची चूक जीवावर बेतली
योगीराज नारायण आकोदे हा त्याच्या कुटुबीयांसोबत हसनाबाद येथे राहत होता. योगीराज आपल्या आईसोबत खुलताबाद तालुक्यातील सोबलगांव येथे प्रदिप जाटवे यांच्याकडे आला होता.प्रदीप जाटवे यांच्या घरी पाहुणे येणार होते यामुळे त्यांच्या घरी स्वयंपाक सुरू होता. सायंकाळी पाहुण्यांसाठी पाहुणचार सुरु असताना योगीराज हा खेळता खेळता वरण बनविलेल्या भांड्याजवळ आला. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो उकळत्या वरणाच्या भांड्यात पडला. यानंतर घरातल्या लोकांच्या लक्षात हि गोष्ट येईपर्यंत खूप उशीर झाला होता. यानंतर योगीराजला तात्काळ वरणाच्या भांड्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी या बालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो जास्त प्रमाणात भाजला गेला असल्याने त्याचा उपचारदरम्यान मृत्यू (5 year old boy dies) झाला.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय