टिक-टॉकसह ‘या’ ५० चिनी ॲप भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक; जाणून घ्या त्यांची नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या टिकटॉकसह ५० चिनी ॲपचा वापर न करण्याचा इशारा भारत सरकार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. चीनचे हे ५० ऍप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. या ऍपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. यामध्ये Tik-Tok, Helo, UC Browser आणि Zoom अशा ॲप्सचा समावेश आहे.

शिवाय चीनमधील शॉपिंग ॲप Shien आणि Xiaomi देखील सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. Tik-Tok, Helo, UC Browser या ॲप्सचा युझर्स आपल्या मनोरंजनासाठी वापर करतात. परंतु हे सर्व ॲप्स तुमच्या फोनची लोकेशन आणि महत्त्वाची माहिती हस्तगत करते. शिवाय ॲप्सच्या माध्यमातून हस्तगत केलेली सर्व माहिती चिनी कंपन्यांनी चीन सरकारला पुरवणे बंधनकारक असते. या माहितीच्या सहाय्याने चिनी गुप्तचर यंत्रणा आणि चिनी सैन्य देशावर हल्ला करण्याची रणनीती आखू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या ॲप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे.

ही चिनी ॲप्स तुमच्या फोनमध्ये आहेत का?

TikTok

Vault-Hide

Vigo Video

Bigo Live

Weibo

WeChat

SHAREit

UC News

UC Browser

BeautyPlus

Xender

ClubFactory

Helo

LIKE

Kwai

ROMWE

SHEIN

Zoom

NewsDog

Photo Wonder

APUS Browser

VivaVideo- QU Video Inc

Perfect Corp

CM Browser

Virus Cleaner (Hi Security Lab)

Mi Community

DU recorder

YouCam Makeup

Mi Store

360 Security

DU Battery Saver

DU Browser

DU Cleaner

DU Privacy

Clean Master – Cheetah

CacheClear DU apps studio

Baidu Translate

Baidu Map

Wonder Camera

ES File Explorer

QQ International

QQ Launcher

QQ Security Centre

QQ Player

QQ Music

QQ Mail

QQ NewsFeed

SelfieCity

Clash of Kings

Mail Master

Mi Video call-Xiaomi

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment