खळबळजनक!! शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर आली होती असा खळबळ जनक दावा शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला. ऐवडच नव्हे तर 100 कोटींची ऑफर दिली तरी आपण शिवसेना सोडणार नाही असेही ते म्हणाले

एवढंच नाही तर बंडखोरी करण्यासाठी दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचं फुटेजही असल्याचा दावा उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. पण मला 100 कोटी जरी दिले तरी मी गद्दारी करणार नाही असेही उदयसिंह राजपूत यांनी स्पष्ट केल. मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा आहे. मला पदाचा हव्यास नाही असेही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेने शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याविरुद्ध शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून आज त्यावर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकार आणि शिंदे गट या दोघांचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे.

Leave a Comment