नवी दिल्ली । म्युच्युअल फंड (Mutual Fund) उद्योगातील संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) ने डिस्ट्रीब्यूटर्स आणि व्यक्तींसाठी एआरएन रजिस्ट्रेशन (ARN registration) आणि नूतनीकरण शुल्कामध्ये 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. Amfi ने ARN रजिस्ट्रेशन फी 50 टक्क्यांनी कमी करून 1,500 रुपये आणि नूतनीकरण फी 50 टक्क्यांनी कमी करुन 750 रुपये केली आहे. पोस्ट ऑफिस आणि मायक्रोफायनान्स संस्थांसाठी (MFI) ARN रजिस्ट्रेशन फी कमी करण्यात आली आहे. जे 7,500 रुपये आणि नूतनीकरण फी 3,750 रुपये करण्यात आली आहे. आजपासून हा नियम लागू केला जात आहे.
Amfi काय म्हणाले ते जाणून घ्या
Amfi ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, Amfi registration number (ARN) आणि EUIN (employee unique indentifications number) रजिस्ट्रेशन आणि नूतनीकरण शुल्क कमी करण्याचे उद्दीष्ट म्हणजे या उद्योगातील तरुण व्यावसायिकांना देशभरातील लहान सेव्हर्सपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित करणे आहे.
करिअरची संधी म्हणून फायदेशीर
Amfi चे सीईओ एनएस वेंकटेश म्हणाले की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स आणि व्यक्तींसाठी ARN आणि EUIN registration आणि नूतनीकरणासाठी कमी केलेली फी म्युच्युअल फंडाच्या विस्तारास मदत करेल. त्याच बरोबर, आम्हाला युवा पिढीने म्युच्युअल फंडाचे वितरण एक रोमांचक कारकीर्दीची संधी म्हणून पहावे अशी आमची इच्छा आहे. तसेच या फी कपातीनंतर आम्ही आशा करतो की, आम्ही बरेच नवीन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर्सना आकर्षित करू शकू.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group