Friday, June 9, 2023

सातारा जिल्ह्यात नवे 569 कोरोना पाॅझिटीव्ह तर जिल्ह्यातील 34 मृत्यूपैकी खटाव तालुक्यातील 22 बाधित

सातारा | सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 569 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 917 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 9 हजार 539 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 5.96 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 519 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 30 हजार 798 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 16 हजार 334 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 592 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 34 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

शनिवारी दिवसभरात मृत्यू झालेल्या मृत्यूत 34 पैकी एकट्या खटाव तालुक्यात 22 बाधितांचे मृत्यू झाल्याचे रिपोर्टमध्ये आहे. अत्यंत चिंताजनक आकडा आल्याने खटाव तालुक्यात चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे.

राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाणा 96. 83 टक्के

राज्यात आज 4 हजार 797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 89 हजार 933 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के आहे.

राज्यात आज 130 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. एकूण 37 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात आज एकाही मृत्यूची नोंद नाही. धुळे, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पाच जिह्यांमध्ये आज एक कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.