कॉस्मेटिक्स कंपनी L’Oreal वर 57 खटले दाखल; प्राणघातक रसायनांचा वापर केल्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रेंच कॉस्मेटिक कंपनी लॉरिअलवर 57 खटले दाखल करण्यात आले आहेत. लोरियल आणि इतर कॉस्मेटिक कंपन्या केस सरळ आणि मऊ करण्यासाठी अनेक हानिकारक रसायनांचा वापर करतात, असा गंभीर दावा शिकागोच्या फेडरल कोर्टात करण्यात आला आहे. अशा उत्पादनांमुळे कर्करोग आणि इतर आजारांचा धोका असतो असेही म्हंटल गेलं आहे.

लॉरिअल कंपनीच्या उत्पादनांमध्ये कॅन्सर आणि इतर आजाराला आमंत्रण देणारी औषधी केली जात आहे. कॉस्मेटिक कंपन्यांना या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणार्‍या धोकादायक रसायनांच्या हानीबद्दल माहिती होती, परंतु तरीही त्यांनी त्यांची विक्री सुरू ठेवल्याचा दावा दाव्यांमध्ये करण्यात आला आहे. यानंतर अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश मेरी रोलँड यांनी कॉस्मेटिक कंपन्यांनी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या कंपन्यांवर आरोप केले जात आहेत त्यामध्ये L’Oréal SA ची यूएस उपकंपनी, भारतातील गोदरेज सोन होल्डिंग्स इंक आणि डाबर इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहायक कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, आपल्यावर केले जात असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आमच्या कंपनीच्या उत्पादनात कोणतेही हानिकारक रसायन वापरले जात नाही असं म्हणत लॉरिअलने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.