सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्याला आज पुन्हा मोठा झटका बसला आहे. मागील १२ तासात तब्बल ५८ नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कोरोनामुळे २ मृत्यूंचीही नोंद झालेली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज बुधवारी सकाळी सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. तर उशिरा जिल्ह्यात ५ नवीन सापडल्याचे होते.
तसेच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय कोविड बाधित रुग्ण याचे निधन झाले आहे आणि जांभेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ३९४ वर पोहोचली आहे. साताऱ्यातील ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या जिल्ह्यातील २५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील १२६ जण कोरोनाच्या आजारातून सुखरुपपणे बरे झाले आहेत.
तालुकानिहाय कोरोना बाधित
माण तालुका- म्हसवड-1, तोंडले-1, भालवडी-1 व लोधवडे-2
सातारा तालुका- जिमनवाडी 2, खडगाव-1, कुस बुद्रुक 1
वाई तालुका- आकोशी-1, आसले-1, मालदपूर 1, देगाव-1 सिद्धनाथवाडी-1 व धयाट-1
पाटण तालुका -धामणी-4, गलमेवाडी 1, मन्याचीवाडी 1, मोरगिरी 2, आडदेव 1, नवारस्ता 1, सदुवरपेवाडी 2,
जांभेकरवाडी 1 (मृत्यु)
खंडाळा तालुका- अंधोटी 2, घाटदरे 1 व पारगाव 7
जावळी – सावरी 3, केळघर 2
महाबळेश्वर तालुका- कासरुड 3, देवळी 3 गोळेवाडी 1
कराड तालुका- खरोड 2, म्हासोली 1, वाजरवाडी 1, उंब्रज 1
फलटण तालुका सस्तेवाडी 1
खटाव- वांझोळी 1 वरची अंभेरी 1
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”