कराड, पाटण तालुक्यातील 16 सिमेंट बंधाऱ्यांसाठी 6 कोटीचा निधी : खा. श्रीनिवास पाटील

0
96
Shrinivas Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड आणि पाटण तालुक्यातील सिंचनाच्या 16 कामांसाठी सुमारे 6 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंधारे बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून कराड व पाटण तालुक्यातील शंभर हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय आहे. मान्यता मिळाली आहे.

कराड तालुक्यातील अंतवडी (खिंड शिवार) येथील बंधाऱ्यासाठी 32 लक्ष 85 हजार, अंतवडी (पोळ खडी शिवार) बंधायासाठी 39 लक्ष 99 हजार, अंतवडी (रत्नकर शिवार) बंधाऱ्यासाठी 51 लक्ष 18 हजार, अंतवडी (टेक शिवार) बंधायासाठी 39 लक्ष 91 हजार, अंतवडी (गुरबकी शिवार) बंधाऱ्यासाठी 36 लक्ष 97 हजार, अंतवडी (नाईकवा मंदिर शेजारी) बंधायासाठी 29 लक्ष 14 हजारांचा निधी मंजूर झाला आहे.

अंतवडी (जाळीचे शेत) बंधाऱ्यासाठी 34 लक्ष 3 हजार, डिचोली बाबरमाची ( विठ्ठल कोळेकर विहीर) बंधाऱ्यासाठी 30 लक्ष 99 हजार, वहागाव बंधाऱ्यासाठी 30 लक्ष 52 हजार, अभईचीवाडी बंधाऱ्यासाठी 33 लक्ष 39 हजार, तळबीड बंधाऱ्यासाठी 30 लक्ष 52 हजार निधी मंजूर झाला पाटण तालुक्यातील टेळेवाडी (टेक शिवार) येथील बंधाऱ्यासाठी 38 लक्ष 43 हजार, टेळेवाडी (दोधानी शिवार) बंधायासाठी 37 लक्ष 99 हजार, मालदन (बाधे शिवारच्या मागे) बंधाऱ्यासाठी 41 लक्ष 63 हजार, मालदन (बाधे शिवार) बंधायासाठी 53 लक्ष 36 हजार, खळे बंधाच्यासाठी 36 लक्ष 87 हजार असे एकूण 5 कोटी 97 लक्ष 75 हजारांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here