केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातील आज सकाळी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह भाषेतील पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या प्रकरणी तिच्याविरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला ठाणे पोलिसांनी अटकही केली. मात्र, तिने केलेल्या कृत्याचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन करण्यात आलेले आहे. केतकी चितळेचा अभिमान, ती कणखर आहे. स्वतः वर टीका झाली की सगळं आठवतं , अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

सदाभाऊ खोत यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांच्याबाबत केतकी चितळे हिने केलेल्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, केतकी चितळे हिचा अभिमान वाटतो. ती अजूनही कणखर आहे. स्वतावर जेव्हा टीका होते तेव्हा सगळं आठवत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. आम्हाला प्रस्थापितांचा वाडा पाडायचा आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले आहे.

केतकी चितळेची नेमकी फेसबुक पोस्ट?

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले की, तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll, ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll, समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll, ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll, भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll, खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll, याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.