व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ऑफिसवरून घरी जाताना काळाचा घाला ! ओव्हरटेकिंगच्या नादात कारचालकाचा मृत्यू

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपले काम आटपून घरी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. सनफ्लेग कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात हा भीषण अपघात घडला आहे. या मृत कर्मचाऱ्याने ट्रकला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. वरठी-सिरसी मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात (Accident) घडला आहे.

रमेश कुमार टंडन असे या अपघातात मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे तर जखमींमध्ये भूरे नामक व्यक्तिचा समावेश आहे. हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला असल्याचे समजत आहे. आपली कामे आटपून घरी निघालेल्या सनफ्लेग कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला समोरासमोर भीषण धडक दिली. या या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या वरठी-सिरसी मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी मृत रमेश कुमार टंडन नेहमीप्रमाणे आपली कंपनीतील रात्रपाळी आटोपुन रात्री 11 वाजता भंडारा येथील आपल्या निवासस्थानी आपल्या खाजगी कारने निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा एक कर्मचारी होता. दरम्यान वरठी सिरसी मार्गावर ओव्हरटेक करत असताना समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि त्या अपघातात (Accident) गाडीचा पूर्णपणे अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात रमेश कुमार टंडन यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल