काळाचा घाला! लग्नासाठी पुण्याहून बीडला जाताना अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. बीडच्या पाटोदा – मांजरसूंबा रोडवरील पाटोद्याजवळ बामदळे वस्ती इथे स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोमध्ये हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातामध्ये (accident) 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गाडीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले.

काय घडले नेमके ?
पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जीवाचीवाडी इथे जात असताना हा अपघात (accident) झाला. पाटोदा शहराजवळील बामदळे वस्तीजवळ सकाळी सातच्यादरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, स्विफ्ट कार आयशर टेम्पोच्या खाली घुसली. अखेर ही स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली.

या अपघाताची (accident) माहिती मिळताच पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आतमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आलं तेव्हा गाडीमधील लोकांच्या शरीराचा अक्षरशः चंदामेंदा झालेला होता.

हे पण वाचा :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय

हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश