हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात अग्रेसर कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स लिमिटेड अग्रेसर आहे. या कारखान्याच्या 12 व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण 123 दिवसांच्या गळीत हंगामात 6 लाख 33 हजार 207 मेट्रीक टन ऊस गाळप केले. यानिमित्त विनायक भोसले यांच्या हस्ते ऊसतोडणी वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कृष्णा काशीद, नवनाथ आरसुळ, भाऊसाहेब काशीद, बजरंग धोत्रे, अशोक पवार, किशोर मुळक, संतोष ढाकणे, सुंदर पोळ, हनुमान भिगले, बाबू शेंबडे या तोडणी वाहतूकदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी कारखान्यातील मिल फिटर गजानन पाटील आणि सौ. स्वाती पाटील या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाला जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, उपसरव्यवस्थापक (टेक्निकल) आर. आर. इजाते, चीफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट जी. व्ही. हराळे, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, ई.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, मनुष्यबळ विकास अधिकारी संजय भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, डेप्युटी चीफ केमिस्ट बी. जी. चव्हाण, के डिस्टीलरी विभागप्रमुख व्ही. जी. म्हसवडे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिंदे, सुरक्षा अधिकारी विठ्ठल भोसले, केनयार्ड सुपरवायझर एस. एम. सोमदे, ए. एम. गोरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.